। अहमदनगर । दि.13 फेबु्रवारी । नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये असलेल्या एका सोनाराच्या दुकानात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले.
ही घटना दि. 10 ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान रात्रीच्या वेळी घडली. याप्रकरणी उमेश जनार्दन लोळगे (वय 45, रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोळगे यांचे वाळकीमध्ये सोनाराचे दुकान आहे. सायंकाळी काम आटोपून त्यांनी दुकानाला कुलूप लावून ते व्यवस्थित बंद केले हेाते.
अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उपकापाचक करून सुमारे 35 हजार रुपयांचे चांदीच्या बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू चोरून नेल्या.
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे व नगर तालुका ठाण्याचे प्रभारी अधिकारी सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी लोळगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.