मांजाने चिरला बँक अधिकाऱ्याचा गळा... ; नायलॉन मांजा येतो कुठून?


। नागपूर । दि.12 जानेवारी ।  रस्त्याने जात असताना नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यामुळे एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा गळा कापल्याची घटना बेसा चौकामध्ये घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. घटनेच्यावेळी निवृत्त बँक व्यवस्थापक प्रकाश पोटे (वय-६२) हे आपल्या नातेवाइकांची भेट घेऊन घरी जात होते. 

तोफखाना पोलिसांची कारवाई, घरगुती वस्तू चोरणारा जेरबंद 

थंडीमुळे त्यांनी आपल्या गळ्यात मफलर बांधला होता. बेसा चौकाकाढून जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला मांजा अटकला. काही कळण्याअगोदरच नायलॉन मांजाने मफलर कापून त्यांचा गळा चिरला आहे.

खासगी ट्रॅव्हल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तीन जखमी 

पोटे यांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत त्यांचा गळा रक्तबंबाळ झाला होता. लगेच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या गळ्यावर ७ टाके लावले आहेत. नायलॉन मांजा  बाळगण्यास आणि विकण्यास प्रतिबंध असताना देखील पतंग उडविणाऱ्यांच्या

राज्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता 

हातात नायलॉन मांजा येतो कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी विक्रेत्याबरोबर नायलॉन मांजाने पंतग उडविणाऱ्यांवर देखील कारवाई करायला हवी, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे.

नगरच्या यश शाह व सई काळे यांची निवड

Post a Comment

Previous Post Next Post