खासगी ट्रॅव्हल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तीन जखमी

। अहमदनगर । दि.12 जानेवारी । पुणेकडून भरधाव वेगात नगरकडे येणार्‍या चैतन्य ट्रॅव्हलच्या खासगी बसने (क्रमांक एआर जे 51 पी 0494) बोल्हेगाव येथून केडगाव बायपास रोडने वाळकीकडे जाणार्‍या मोटरसायकलला (क्रमांक एमपी 46-4965) जोरात धडक दिली. 

या धडकेत मोटारसायकलवरील अंबाराम नंदू डूडवा (वय 35), त्यांची पत्नी पप्पी अंबाराम डूडवा (वय 33) व त्याची दोन लहान मुले (रा. लावणी फण्या ता. सेंधवा जि. बडवाणी, राज्य मध्यप्रदेश. हल्ली राहणार बोल्हेगाव, गांधीनगर, सावेडी) असे गभीर जखमी झाले. जखमींना औषधोपचाराकरिता तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पण औषधोपचारादरम्यान अंबाराम डूडवा यांचा मृत्यू झाला.

ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव बायपास चौकाजवळील हॉटेल नीलसमोर रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता घडली. अपघात होतात खाजगी ट्रॅव्हल बस चालक घटनास्थळावर बस सोडून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे केडगाव पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले

त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना औषधोपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय हलविण्यात आले. पण, उपचार सुरू असताना अंबाराम डूडवा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार बी. एम. इखे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post