। अहमदनगर । दि.12 जानेवारी । घरगुती वस्तूंची चोरी करणारा चोरटा तोफखाना पोलिसांनी जेरबंद केला. शंकर मच्छिंद्र नेटके (वय 32, रा. लालटाकी, नगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक समाधान सोळंकी, पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, धीरज खंडागळे, चेतन मोहिते, शिरीष तरटे, सुनील शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अज्ञात चोरट्याने घरगुती वापराच्या वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दि.14 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी हा लालटाकी येथील लक्ष्मीमाता मंदिरासमोर उभा आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा लावून त्यास शिताफीने पकडले. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 3 हजाराचे घरगुती वापराचे भांडे, एक इलेक्ट्रीक मोटार असा एकूण 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.