। अहमदनगर । दि.12 जानेवारी । तू आमच्या जवळ का थांबलास? असे म्हणत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केडगाव येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी नंदकुमार अरविंद भोसले (वय 44, रा. शिवाजीनगर, मराठी शाळेजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसले यांना दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नाना गोरे (रा. झेडपी शाळेजवळ, शिवाजीनगर, केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजता घडली. तू आमच्या जवळ येऊन का थांबलास? असे म्हणून गोरे याने भोसले यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारानंतर भोसले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.