। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याची सुमारे सोळा हजार कांदा गोण्यांची आवक झाली आहे. कांद्याला 2600 रुपयांचा भाव ठरावीक वक्कलाच मिळाला. एक नंबर कांद्याला 2300 रुपयांचा भाव प्रतिक्विंटलचा मिळाला.
हे देखील वाचा...स्कार्फ कुट्टी मशीनमध्ये अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू
पारनेर बाजार समितीत बुधवारी कांद्याचे 16 हजार 264 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2300 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. कांद्याचे प्रतवारीनुसार बाजार भाव : एक नंबर कांदा : 2000 ते 2300, दोन नंबर कांदा : 1500 ते 1900 तीन नंबर कांदा : 1000 ते 1400, चार नंबर कांदा : 200 ते 900.
हे देखील वाचा...घरगुती गॅसचा वापर रिक्षांसाठी ; नालेगावतील छाप्यात रिक्षा जप्त
पारनेर बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरु झाली आहे. लाल कांद्याला आज 2300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. बाजार समितीत 750 नवीन कांदा गोण्यांची आवक होऊन कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 2300 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
हे देखील वाचा...काष्टीत गोळीबराच्या घटनेने जिल्हा हादरला ; सख्खा भाऊ पक्का वैरी!
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.