घरगुती गॅसचा वापर रिक्षांसाठी ; नालेगावतील छाप्यात रिक्षा जप्त


। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । गेल्या अनेक दिवसांपासून शहरात घरगुती गॅसचा वापर हा वाहणांसाठी केला जात असल्याची चर्चा होती. नालेगाव परिसरात रिक्षासाठी घरगुती गॅसचा वापर करण्यात येत असल्याची माहितीवरुन पुरवठा विभागाने छापा टाकुन या ठिकाणी एक रिक्षा जप्त केली आहे.

नालेगाव परिसरात व्यावसायिक सिलेंडरमध्ये  घरगुती गॅस भरला जात असल्याची बाब नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणली असतानाच घरगुती गॅसचा वापर रिक्षासाठी होत असल्याचे पुरवठा विभागाने उघडकीस आणले आहे. नालेगाव येथे टाकलेल्या छाप्यात घरगुती सिलिंडर, पाच रिक्षा, इंधन भरण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पुरवठा निरीक्षक जयंत कान्हू भिंगारदिवे (रा. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे निलेश गोंविद आरडे (रा. गरवारे चौक, नागापूर एमआयडीसी), विकास नारायण खोसे (रा. नागापूर एमआयडीसी) यांच्याविरोधात भादवि 285, 286, 34, 336 सह जिवनाश्यक वस्तू अधिनियम 1955 कलमान्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. जे. महाजन करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post