। पुणे । दि.17 नोव्हेंबर । पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जनावरांना कुट्टी करीत असताना कुट्टी मशीनमध्ये स्कार्फ आणि केस गुंतल्याने एका 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा...महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईतून एकाला अटक
सोनाली दौंड असं मयत नवविवाहितेचं नाव आहे. सहा महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. या दुर्दैवी घटनेने आंबेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी सोनाली कुट्टी मशीनजवळ गेल्या होत्या.
हे देखील वाचा...घरगुती गॅसचा वापर रिक्षांसाठी ; नालेगावतील छाप्यात रिक्षा जप्त
यावेळी मशीन सुरू असताना अचानक अंगावरील स्कार्फ वाऱ्याबरोबर कुट्टी मशीनमध्ये गेला आणि काही क्षणातच ही दुर्दैवी घटना घडली. या नवविवाहितेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.