। अहमदनगर । दि.04 जुन 2024 । अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ.सुजय विखे पाटील विरुध्द आमदार निलेश लंके अशी लढत पाहिला मिळाली. चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा दणदणीत विजय झाला आहे.
अठराव्या लोकसभेचे धक्कादायक निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून होते.
एकंदरीत ही लढत देशाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र जिल्ह्यामध्ये दोनही मतदारसंघात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
Tags:
Ahmednagar
