फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत : थोरात

।  संगमनेर ।  दि.05 जुन 2024 । देश पातळीवर भाजपाकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नसून याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे. महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली असून सरकार विरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रतिनिधीशी यशोधन कार्यालय या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक,निखिल पापडेजा, यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व
मित्र पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post