| अहमदनगर | दि.24 जुन 2024 | मनमाडवरुन नगरकडे येण्यासाठी एस टी बस मध्ये प्रवास करत असलेल्या महिलेचे पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने नजर चुकवून चोरून नेला.
👉 बायपासवर अपघात : दोन वाहन चालकांचा मृत्यू
याबाबत सीमा वसंत उगलमुगले (रा. मनमाड, ता. नांदगाव, नाशिक) यांनी गुरुवारी (दि.२०) सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सिमा उगलमुगले याबुधवारी (दि.१९) सायंकाळी मनमाडहून नगर कडे येण्यासाठी मनमाड बसस्थानकातून एस टी बस मध्ये बसल्या होत्या.
👉 बेकरीतील युवकांवर प्राणघातक हल्ला करणारे तिघे अटकेत
प्रवासात राहुरी ते नगर एमआयडीसी तील सह्याद्री चौक या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मधील दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. सह्याद्री चौकात बसमधून उतरल्यावर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली.
👉 पाऊस असणार्या जिल्ह्यात पोलिस भरती लांबणीवर!
यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली.त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.
