| अहमदनगर | दि.23 जुन 2024 | अरणगाव परिसरात शनिवारी (दि.22) सकाळीच एक भीषण अपघात झाला. ट्रक , कटेंनर व स्विफ्ट हे तीन वाहने एकमेकांना धडकली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता.
👉 बेकरीतील युवकांवर प्राणघातक हल्ला करणारे तिघे अटकेत
या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते. नगर तालुका पोलिसही घटनास्थळी आले होते.
👉 पाऊस असणार्या जिल्ह्यात पोलिस भरती लांबणीवर!
शनिवारी सकाळी बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात ट्रक व कंटेनरची धडक झाली. त्याच वेळी पाठीमागून स्विफ्ट कार येऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोघे मृत्युमुखी पडले. मागील हप्त्यात याच ठिकाणी दोन वाहनांचा अपघात होऊन त्यात दोघे जखमी झाल्याची घटना घडली होती.
Tags:
Crime
