नीट पेपरफुटीचे प्रकरण : एटीएसने घेतले दोघे ताब्यात
। मुंबई । दि.24 जुन 2024 । नीट पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रात कनेक्शन समोर येण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकारणी नांदेड एटीएसने लातूरमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एक नांदेड मधील तर दुसरा लातूर येथे कार्यरत असल्याची माहिती समजते आहे. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले असल्याची माहिती उशिरा पुढे आली आहे.
👉 महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकणार : खा. नीलेश लंके यांचा विश्वास
नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेड एटीएसने लातूरमधून दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे नीट परीक्षा गैरव्यवहारामध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांना लाभ तर मिळाला नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
👉 बेकरीतील युवकांवर प्राणघातक हल्ला करणारे तिघे अटकेत
आणि जर लाभ मिळाला असेल तर ते विद्यार्थी कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकणाचा तपास कोणा कोणा पर्यंत पोहाचतो हे पाहणे उचित ठरणार आहे.
