| पुणे | ०१ जून २०२४ | पुणे पोर्शे कार अपघात दुर्घटनेत आरोपीस आरोपीच्या वडिलानंतर, आजोबा आणि आरोपीच्या आईला शनिवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू असतांना पोलिसांनी रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप ठेवत आरोपीची आई शिवानी अगरवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज ही माहिती दिली.
शिवानी अग्रवाल हिने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक लृप्त्या केल्या होत्या. पुण्यातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी आलिशान पोर्श कारने एका बाइकला धडक दिली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश होता. बाईकला धडक देणारा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल याचा मुलगा आहे.
हा अपघात झाल्यानंतर त्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. त्यात ससूनच्या डॉटरांचाही सहभाग होता. चौकशीनंतर दोन डॉटरांना निलंबित करण्यात आले. आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. आता आईलाही अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. यात शिवानी अगरवाल हिचा सहभाग होता. तिने पैशाचे आमिष दाखवून स्वतः च्या रक्ताचे नमुने हॉस्पिटलमध्ये दिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर शिवानी फरार झाली होती.
