बुलेट चोरणारी टोळी जेरबंद ; मोटारसायकली हस्तगत


अहमदनगर ।  दि.02 जुन 2024  05 बुलेटसह 10 मोटारसायकलची चोरी करणार्‍यात आल्या. एकुण 13 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. अनिल मोतीराम अल्हाट (वय 23) याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

👉नमामि गंगे प्रकल्पात भ्रष्टाचार : काँग्रेसचा आरोप

जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असून, या घटनांवर पायबंद घालण्यासाठी पोलिस दलाने कडक पावले उचलली आहेत. मोटारसायकल चोरणारे तीन आरोपी श्रीगोंदा बायपास येथे एका मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला प्राप्त झाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच बुलेटसह दहा मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

👉संदीप पाटील संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि दिनेश आहेर, पोलिस अंमलदार बापुसाहेब फोलाने, रविंद्र कर्डिले, रोहित मिसाळ, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, विशाल तनपुरे, अमोल कोतकर, संतोष खैरे, उमाकांत गावंडे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

👉पुणे पोर्शे कार अपघातात आरोपीच्या आईला अटक 

Post a Comment

Previous Post Next Post