नगर-दौंड महामार्गावर कार जळून खाक


| अहमदनगर |  दि.19 जुन 2024 | नगर-दौंड महामार्गावरील चिखली शिवारात सोमवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास इंजिनच्या भागात आग लागल्याने पाच महिन्यापूर्वीच घेतलेली चारचाकी भररस्त्यावर काही मिनिटांत जळून खाक झाली. या घटनेने खळबळ उडाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत बेलवंडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार किशोर तोडमल (रा.भिंगार कॅम्प, नगर) हे सोमवारी सायंकाळी चारचाकी वाहनाने कोळगावहून नगरकडे चालले होते.  नगर - दौड महामार्गावरील चिखली शिवारात आल्यानंतर कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी लगेच कार रस्त्याच्या कडेला उभी केली. धूर कोणत्या कारणाने निघतोय हे पाहण्यासाठी त्यांनी बोनेट उघडले असता काही क्षणातच मोठी आग लागली. कारमध्ये चार जण होते. परंतु ते वेळेत गाडीमधून खाली उतरल्याने संकट टळले. तसेच कार जळून खाक झाली.

Post a Comment

Previous Post Next Post