। अहमदनगर । दि.14 जुन 2024 । बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना नगर मनमाड रोडवरील सिव्हिल हडको येथील गणेश चौकातील तुळजाभवानी मंदिरा शेजारी घडली.
👉 कापड बाजारात कचर्याचे ढिग ; अभिषेक कळमकर आक्रमक
याबाबतची माहिती अशी की सुनिता हरी नागरगोजे व २९ या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून नोकरीस आहे. त्यांनी गणेश चौक येथे खोली भाडेतत्वावर घेताना त्यांचे घरगुती वापरातील सामान घेऊन तिचे राहावयास गेल्या त्यावेळी त्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये एका डब्यात त्यांचे व त्यांच्या मुलीचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
👉 सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून दरोडा टाकणारे दोघे जेरबंद!
त्यानंतर दि. ०७ जून रोजी रात्री कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेली दागिने पाहिले असता त्याचे ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांना दिसले नाही त्यावर त्यांनी सर्व घरांमध्ये पाहणी केली परंतु सोन्याचे दागिने कोठेही मिळून आले नाही यावरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
👉 फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत : थोरात
त्यांच्या कपाटातून चोरट्याने अर्धा अर्धा तोळे वजनाच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चैन चोरीस गेल्या. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सुनीता नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली.
