कापड बाजारात कचर्‍याचे ढिग ; अभिषेक कळमकर आक्रमक

कापड बाजारात कचर्‍याचे ढिग ; अभिषेक कळमकर आक्रमक

आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा 

। अहमदनगर ।  दि.13 जुन 2024 ।  कापड बाजार, सारडा गल्ली या ठिकाणी कचरा  ठेकेदाराचा हलगर्जीपणा आज सकाळी दिसून आला. येथे  आज  दुपारी बारा वाजेपर्यंत कचर्‍याचे ढीग तसेच पडून होते. व्यापारी वर्गांना त्यांची दुकाने उघडण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे व्यापार्‍यांनी माजी महापौर अभिषेक कळमकर आणि नगरसेवक बाळासाहेब बोराटे  यांच्याशी संपर्क करून त्यांना तेथे बोलावून घेतले.  या भागाची पाहणी केल्यानंतर सारडा गल्ली येथे अक्षरशः दुर्गंधी पसरलेली होती.

👉 मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी  सुपरवायझर यांना धारेवर धरले. यावेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी उद्यापासून या ठिकाणी कचरा राहणार नाही. याची लेखी नोंद त्याच्याकडून घेण्यात आली. तसेच  पुढील काळात जर या ठिकाणी कचरा राहिला तर मनपा आयुक्तांच्या दालनात  एक टन भर कचरा टाकण्यात येईल, असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला. मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल केला तरी चालेल. परंतु व्यापारी व नागरिकांसाठी हे आंदोलन केले जाईल, असेही कळमकर यांनी सांगितले.

👉  पावसाची हजेरी ; शेतकर्‍यांमध्ये समाधान

Post a Comment

Previous Post Next Post