विजयी हॅट्रिकसह नितीन गडकरी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


। नवीदिल्ली ।  दि.09 जुन 2024 । मोदी सरकारचा तिसर्‍या मंत्रिमंडळाचा आज मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींसह एनडीएमधील विविध पक्षांच्या खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. 

👉नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ

देशामधून अनेकांनी शपथ घेतली असली तरी महाराष्ट्रातून सर्वात अगोदर भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नागपूरमधून सलग तीन वेळा विजयी होऊन हॅट्रिक साधणारे गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

👉नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक ....

दिल्लीत आज (९ जून) नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

👉सोन्याचे भाव गगणाला भिडले

२०१४ मध्ये त्यांनी प्रथम नागपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली व त्यात त्यांनी काँग्रसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८६ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्येही गडकरी नागपूरमधून विजयी झाले. पहिल्यांदाच लोकसभा गाठणार्‍या गडकरी यांना मोदी यांनी मंत्रिमंडळातही स्थान दिले.  

👉राजकारणात जय, पराजय होत असतो... 

Post a Comment

Previous Post Next Post