युवकाला लिफ्ट मागण्याच्या नावाखाली लुटले


। अहमदनगर । राहुरी । (दि.25 मे 2024) । नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच, त्याची सुटका करण्यासाठी वडिलांकडे 15 लाखांची खंडणीही मागण्यात आली. पाथर्डी रस्त्यावर तिसगाव येथे गाडी थांबली असता, त्याने गाडीतून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

👉 सोनसाखळी चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या

अनिरुध्द विठ्ठलराव जरे (वय 25, मूळ रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा, हल्ली रा. सुभश्री आपार्टमेंट, गुलमोहर रोड) असे या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरे यांची शिंगवे तुकाई (ता. नेवासा) येथे शेती आहे. गुरुवारी ते त्यांच्या वडिलांसह शेतीची पाहाणी करण्यासाठी गेले होते. 

👉  महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकालाची तारीख ठरली !

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नातेवाईकाबरोबर ते पांढरी पूल येथे आले. तेथे बसची वाट पाहत एका कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना नगरला सोडतो, असे सांगितले. घाट चढून इमामपूर येथे आल्यावर अनिरुद्ध याला बंदुकीचा धाक दाखवून गळ्यातील चेन व हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. 

👉  गर्दीचा फायदा घेत गंठण पळविले

त्याचा फोन घेऊन त्यात दोघांनी त्यांचे सिमकार्ड टाकले व त्याच्या वडिलांना फोन लावून 15 लाखांची खंडणी मागितली. गाडी पाथर्डी रस्त्यावर तिसगाव जवळ थांबल्यावर अनिरुद्ध याने गाडीतून पळ काढला. एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या फोनवरून त्याने वडिलांशी संपर्क साधला व स्वतःची सुटका करून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

👉  देवळाली प्रवरामध्ये बिबट्याचे दर्शन 

Post a Comment

Previous Post Next Post