। अहमदनगर । 22 मे 2024 । एसटी बस मध्ये बसण्यासाठी पुणे पुणे येथे बसमध्ये प्रवेश करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने महिला प्रवासाच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना नगर स्टेशन रोडवरील स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानक येथे घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की माधुरी संतोष वासकर (वय 41 राहणार संत किसनगिरी नगर पाईपलाईन रोड सावेडी. मूळ राहणार क्रांतीनगर पाटोदा जिल्हा बीड) या त्यांची नात पूर्वी वारगडे हिच्यासह पुणे येथे जाण्यासाठी पुणे बस स्थानक येथे आले असता पुणे जाणार्या बसमध्ये आत बसण्यासाठी प्रवेश करीत असताना दरवाजातील गर्दीचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले.
बसमध्ये बसल्यानंतर माधुरी वासकर यांना त्यांच्या गळ्यातील गंठण नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब त्यांच्या मुलासह कोतवाली पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात माधुरी वासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 379 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.
👉 विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन
Tags:
Crime
