देवळाली प्रवरामध्ये बिबट्याचे दर्शन


। राहुरी । 21 मे 2024 ।  तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या बंगल्या जवळ बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून त्यास ठार केले. देवळाली प्रवरा परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

देवळाली प्रवरा-गणेगाव रोडवर माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या बंगल्या जवळ बिबट्या आला. बराच काळ हा बिबट्या परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून त्यास ठार केले आहे.

गेटमधून आतमध्ये प्रवेश करून बिबट्या आतमध्ये मुक्तपणे फिरल्याचे यावेळी दिसून आले. या भागात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी माजी नगरसेवक अमोल कदम, संदीप कदम यांनी केली आहे.

👉 पर्यटकांनी काजव्यांचा शांततेत आनंद लुटावा

👉 शेतकऱ्याच्या शेतातील मोटर, केबल चोरीला

👉  शेतकऱ्याच्या शेतातील मोटर, केबल चोरीला

 


Post a Comment

Previous Post Next Post