माफक दरात औषधे उपलब्ध करून देणार : बाबासाहेब ओहोळ
थोरात कारखान्याच्या वतीने ऊस पिकावरील हुमणी अळी नियंत्रण अभियान
। संगमनेर । 25 मे 2024 । हवेतील दमटपणा व ढगाळ हवामान यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा व भाजीपाला इत्यादी पिकांना यापासून नुकसान होत असून ही हुमणी आणि रोखण्यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याच्यावतीने अभियान राबवण्यात येत असून यासाठी माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
ओहोळ म्हणाले की, पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रादुर्भाव वाढत असतो, यामुळे उसासह इतर पिकांनाही मोठे नुकसान होते तर उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही आळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारखान्याच्यावतीने अभियान सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेताच्या कडेला असल्या झाडांच्या फांद्या यांचा डहाळा करणे.
रात्री काठीच्या साह्याने फांद्या हालवून पडलेली भुंगेरे गोळा करून ती कीटकनाशक मिश्रित पाण्यात टाकून मारणे. तसेच जवळच्या झाडांवर फवारणी करणे .भुंगेरे आकेषित करण्यासाठी प्रकाश सापळे लावने, उन्हाळी शेतीची नांगरट उभी आडवी करून जमीन तापू देणे, नींबोळी पेंडीचा वापर करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे .
तरी जास्तीत जास्त शेतकरी व ऊस उत्पादकांनी या अभियानात सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सर्व संचालक मंडळांने केले आहे
👉 महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकालाची तारीख ठरली !