रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालया ची कु. अश्विनी जाधव कला शाखेत प्रथम

। अहमदनगर ।  (दि.25 मे 2024) । पुणे बोर्डाकडून जाहीर झालेल्या 12 वी च्या निकालात नगर शहरातील नामांकित  रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल 89.87 टक्के लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयांमधील कु.अश्विनी जाधव हिने कला शाखेत 84.83 टक्के गुण मिळवित महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

तिच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रा.ह दरे साहेब, सहसचिव जयंतराव वाघ, माजी सेक्रेटरी तथा ज्येष्ठ विश्वस्त जी.डी खानदेशे, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर पर्यवेक्षिका दारकुंडे मॅडम,

वर्ग शिक्षक प्रा. डॉ. म्हातारदेव म्हस्के, प्रा. मोहन कांजवणे, प्रा. राजेश हिंगे, प्रा. जालिंदर पिंपळे, प्रा. दत्तात्रय चौधरी, प्रा. रंगनाथ जगधने, प्रा. धनंजय लाटे, प्रा. अर्चना सुंबे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post