। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी 2024 । जिल्ह्यात सद्यस्थितीत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत फार कमी होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. हे प्रमाण समप्रमाणात आणण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोरे, अशासकीय सदस्य सुधा कांकरिया यांच्यासह सर्व ताल ुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
👉 राष्ट्रवादी पक्ष-चिन्ह अजित पवारांचा ; निवडणूक आयोगाचा निर्णय
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी असलेले प्रमाण हे जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे. या बाबीच गांर्भीय लक्षात घेत अधिकारी, कर्मचार्यांनी दक्षपणे काम करत जिल्ह्यात अनधिकृतपणे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणार्या सोनोग्राफी केंद्राची माहिती घेऊन केंद्राची तपासणी करावी. तपासणीमध्ये दोषी आढळणार्यांवर कडक कारवाई करावी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळयांची विक्री करणार्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.

Tags:
Maharashtra