ट्रेलरच्या धडकेत चाळीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 

। अहमदनगर  । दि.26 फेब्रुवारी 2024 । नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारात झालेल्या अपघातात एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे. ज्ञानदेव नामदेव सानप (वय ४१, रा. वडझरी ता. पाटोदा, जि. बीड) असे मयत तरूणाचे नाव आहे. सदरची घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५० वाजता घडली.

👉 मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला : उपमुख्यमंत्री 

याप्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चालक शहादेव वसंत बनवे (रा. कचरवाडी ता. जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे भाऊ आनंदराव नामदेव सानप (रा. पाटोदा, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. 

👉 मराठा समाज आक्रमक...बारस्कर याच्यावर कारवाईची मागणी

ज्ञानदेव हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर घेऊन नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्याने जात असताना खोसपुरी शिवारात हॉटेल राजपुत लगत बनवे याने त्याच्या ताब्यातील वाहनाची अचानक लेन बदलून ब्रेक मारले. त्यामुळे ज्ञानदेव यांच्या ताब्यातील ट्रेलर ला पाठीमागून धडक बसून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अंमलदार थोरवे अधिक तपास करीत आहे.

👉 गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्स मधून मोबाईल सह रोकड पळवली 

Post a Comment

Previous Post Next Post