पारनेरमध्ये नगरसेवक पठारे यांच्यावर भरदिवसा गोळीबार…


। पारनेर । दि.15 फेब्रुवारी 2024 । पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आहे.

गोळी झाडता न आल्यामुळे नगरसेवक युवराज पठारे बालंबाल बचावले आहेत. पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ झडप घालून गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला पकडले असून पोलिस निरीक्षक समीर बारवकर पुढील तपास करत आहेत.

येथील हॉटेल दिग्विजय जवळील घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास  घटना घडली. आरोपी अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिस चौकशी सुरू आहे.

पारनेर शहरातील बसस्थानकाजवळील मुख्य चौकात गुरुवारी सकाळी नगरसेवक पठारे आपल्या तीन-चार मित्रांसह चहा घेत होते. त्यावेळी एक अल्पवयीन मुलगा हातात गावठी कट्टा व चाकू घेऊन आला. त्याने युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावला.

सुरुवातीला तो बहुरूपी असल्याचे त्यांना वाटल्यामुळे त्यांनी त्याची मस्करी करत मजा घेण्यास सुरवात केली. परंतु त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्यावर सगळे सावध झाले. त्याने पहिली गोळी झाडली तेव्हा फक्त आवाज झाला. मात्र, गोळी आतच अडकली. तो दुसऱ्यांचा प्रयत्न करण्यापूर्वी तेथे उपस्थित असलेले भरत गट यांनी त्याच्या हातातून शस्त्र हिसकावले.

Post a Comment

Previous Post Next Post