मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण संपन्न
। अहमदनगर । दि.20 जानेवारी 2023 । राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरिता अहमदनगर जिल्हा प्रशासनातर्फे सुमारे १०३२५ प्रगणक व सुमारे ७५० पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत. हे सर्वेक्षण मोबाईल प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
हे वाचा...घरातून नायलॉन मांजाची चोरून विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई
या प्रगणकांना प्रशिक्षण देण्याकरिता प्रत्येक तालुक्यातील तसेच अहमदनगर महानगरपालिका व कटक मंडळातील तालुकास्तरीय, वार्डस्तरीय प्रशिक्षक नेमले आहेत. या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. या प्रशिक्षणास गोखले इन्स्टिट्यूट, पुणे येथील प्रशिक्षक सिद्धांत कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
हे वाचा...श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठानेसाठी अण्णांना निमंत्रण
२१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी तालुकास्तरीय ,वार्डस्तरीय प्रशिक्षकांकडून सर्व प्रगणकांना व पर्यवेक्षकांना या सर्वेक्षणाच्या मोबाईल प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वेक्षणाचे कामकाज सुरु करण्यात येईल.
हे वाचा...‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सू
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे तसेच त्यांना सर्वेबाबत आवश्यक माहिती पुरवावी. कुटुंबाचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर या कुटुंबाच्या घरावर चिन्हांकन करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. असे जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविण्यात आले आहे.
