एमआयडीसीत वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला

। अहमदनगर । दि.02 जानेवारी 2024 । घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलेल्या किराणा व्यापार्‍याचे घर चोरट्यांनी फोडून घरातील लोखंडी तिजोरीत ठेवलेले 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 50 हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज तिजोरीसह चोरून नेल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील जिमखाना जवळील माताजी नगर येथे घडली.

👉प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यावर होणार कारवाई

याबाबतची माहिती अशी की सुजय सुनिल गांधी (रा.माताजी नगर, जिमखाना, एमआयडीसी) त्यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने नगर शहरातील केशर गुलाब मंगल कार्यलयात विविध कार्यक्रम होते. साखरपुडा रात्री असल्याने गांधी  कुटुंबीय रात्री 8 चे सुमारास घराला कुलूप लावून केशर गुलाब मंगल कार्यालय येथे गेले होते. 

👉घरात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

तेथून कार्यक्रम आटोपून सर्वजण रात्री घरी आले असता त्यांना घराचे गेट उघडे दिसले. त्यांनी आत मध्ये जावून पाहीले असता घराचे मुख्य दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले दिसले व दरवाजाला कडी लावलेली दिसली, त्यानी कड़ी उघडून आतमध्ये प्रवेश करुन हॉल मधील शोकेशचे कप्प्यामध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरी पाहीली असता ती तेथे दिसली नाही. त्यानंतर घरातील इतर रुम पाहिल्या असता तेथे देखील सामानाची उचकापाचक केल्याचे दिसुन आले.

👉शिक्षकेतर संघटनेचे ५१ वे राज्यव्यापी अधिवेशन...

चोरीची घटना लक्षात आल्यावर गांधी यांनी एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच रात्र गस्तीवरील पथकाने घटनास्थळी येवून पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.चोरट्यांनी  तिजोरीतील तब्बल 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 50 हजारांची रोकड असा ऐवज होता असे गांधी यांनी या फिर्यादीत म्हंटले आहे.

👉समशेरपुर ए.टी.एम.मशिन चोरी करणारे जेरबंद  

Post a Comment

Previous Post Next Post