घरात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

। अहमदनगर । दि.30 डिसेंबर । नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात ४७ वर्षीय शेतकऱ्याने अज्ञात कारणातून राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गहिले मळा येथे घडली. 

संजय बाळाजी गहीले (वय ४७ रा. अरणगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हा प्रकार दुपारी उघडकीस आला. गहीले यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी त्यांचा पुतण्या महेश गहीले यांनी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.याबाबतची माहिती मेडीकल ऑफिसर डॉ. खेडकर यांनी रुग्णालयात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार जठार यांना दिली. त्यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात सी आर पी सी 174 प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान संजय गहीले यांनी आत्महत्या का केली, याची माहिती समजू शकली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post