। अहमदनगर । दि.04 जानेवारी 2024 । हरवलेले व चोरी गेलेले 11 लाख 35 हजारांचे 40 विविध कंपनीचे मोबाईल तोफखाना पोलिसांनी हस्तगत करुन मूळ मालकांना परत केले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजेप्रमाणेच सध्याच्या काळात मोबाईल ही प्रत्येक नागरिकांची मुलभूत गरज झालेली आहे. त्यातुनच गुन्ह्याचा तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे तपास या विविध उपक्रमाने तोफखाना पोलिसांनी आपल्या कर्तृत्वातून नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणीहून नागरिकांचे चोरी गेलेले व हवलेले तब्बल 11 लाख 35 हजार रुपयांचे 40 विविध कंपनीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करुन त्यांच्या मूळ मालकांना पोनि मधुकर साळवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात परत केले आहे.
त्यामुळे नागरिकांनी पोनि साळवे यांना समक्ष भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करुन तोफखाना पोलीस स्टेशनचे विशेष आभार मानले. ऋषाली हिरालाल भोसले (रा. कोतुळ ता श्रीगोंदा जि.अहमदनगर), महेश पोपट पालवे (रा. सावेडी ता जि अहमदनगर ), घनशाम मोहनलाल परदेशी (रा. पाईपलाईन, अहमदनगर), योगेश मोहन कापसे (भिंगार ता. जि. अहमदनगर), विजय लक्ष्मण रोकडे (रा. बोल्हेगांव अहमदनगर)
सुखदेव मधुकर वाघमारे (रा.दिल्ली गेट,अहमदनगर), अरबाज लियाकत तांबोळी (रा. मुकुंदनगर, अहमदनगर), निलम मोहसीन शेख (रा.मुकुंदनगर, अहमदनगर), सिध्दी महेंद्र बोरा (रा. आगरकर मळा, अहमदनगर ), संदिप सर्जेराव घोरपडे (रा. वांबोरी, अहमदनगर), गौरी संजय खुडे (रा. बोल्हेगांव, अहमदनगर), नंदकुमार चिखाले (रा. बालिकाश्रम, अहमदनगर ),
अबिद युसुफ शेख (रा. मंगलगेट, अ.नगर), संतोष लक्ष्मण अंकाराम (रा. सावेडी, अहमदनगर), फैजान आयुब शेख (रा.कोठला, अहमदनगर ), शेख सलीम मंहमद (रा.कोठला अहमदनगर), शुभम चंद्रकात भोर (रा.बोल्हेगांव, अहमदनगर ), दत्तात्रय वेणुनाथ बोर्डे (रा. छ.संभाजीनगर ), सुरज वैजनाथ वाकणकर (रा. निर्मलनगर, अहमदनगर ) वर्षा दत्तात्रय देशपांडे (रा. नामदेव नगर, अहमदनगर),
भगवान एकनाथ गंगावणे (रा. बुर्हाणनगर, अहमदनगर ) शिवप्रसाद (रा. अहमदनगर) गावित कल्पना बाबु (रा. अहमदनगर ), शेरखान इब्राहिम पठाण (रा.कोठला, अहमदनगर), अशोक अंबादास लंवाडे (रा.पाथर्डी अहमदनगर ), संदिप तुकाराम गडाख (रा. अहमदनगर) शुभम आदिनाथ खुडे (रा. अहमदनगर), संदिप विेश कर्म (रा. सावेडी, अहमदनगर), रविंद्र भागवत लोखंडे (रा.अहमदनगर ), रुतुजा कल्याण गाडे (रा. अहमदनगर), अमित पलांगे (रा. अहमदनगर ) राधिका धनवटे (रा.अहमदनगर)
रामहरि भाऊसाहेब खंडागळे (रा. भारतनगर बोल्हेगांव अहमदनगर) शिवकिरण शामलाल (रा. गांधीनगर अहमदनगर) अनिकेत यशवंत बोरगे (रा.चितळे रोड अहमदनगर ) विकास चांगदेव बुरुडे (रा. बुरुडे मळा, अहमदनगर) वैशाली घोंगडे (रा. अहमदनगर ), शिवम राजेंद्र खटके (रा. अहमदनगर) वैष्णवी विठ्ठल वराट (रा. जामखेड, जि. अहमदनगर ), शादाब आरिफ शेख (रा. जामखेड, जि. अहमदनगर), तनवीर इब्राहिम शेर (रा.पाथर्डी जि. अहमदनगर) यांचे मोबाईल त्यांना परत मिळाले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, पो.कॉ सुमित गवळी, दक्षिण मोबाईल सेल पो.कॉ नितिन शिंदे यांनी केली आहे.
नागरिकांनी गर्दिच्या ठिकाणी किंवा बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये. रस्त्यावर सापडलेला मोबाईल किंवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये. तसेच, मोबाईल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा!- मधुकर साळवे
पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस ठाणे
Tags:
Crime
