गुटखा वाहतूक करणाऱ्या सहा जणाविरुध्द कारवाई ; 28 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त

 


। अहमदनगर । दि.14 जानेवारी 2023 ।  महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला हिरा गुटखा व पानमसाला विक्रीसाठी, वाहतुक करणाऱ्या 6 आरोपी विरुध्द कारवाई करुन त्यांच्याकडून, 28 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर सोलापूर रोड वरील रुई छत्तीशी गावाच्या शिवारात सापळा लावून केली.

हे वाचा...‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट 

या बाबतची अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी नगर सोलापूर रोड वरील रुई छत्तीसी गावाच्या शिवारात सापळा रचला. पोलिसाना मिळालेल्या माहिती प्रमाणे दोन संशयित वाहने अशोक लेलँड गाडी (क्रमांक एम एच 10 सी आर 8313) व (एम एच 09 एफ एल 6028,) येताना दिसल्याने पोलिसांनी वाहने थांबवून आतील इसमाना त्यांना त्यांची नावे विचारली केली.

हे वाचा..माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील दानपेटी चोरीस 

मात्र त्या इसमाना त्यांची नाव सईद ऊर्फ रिजवान अर्शद दिवाण (रा.रविवार पेठ, कराड, जि. सातारा), इसरार अहमद सलाउद्दीन शेख (रा.इसकपुर, ता.माटीगंज,जि.आझमगड रा. उत्तर प्रदेश), जुबेर सिंकदर डांगे (रा.कोले, ता. कराड, जिल्हा सातारा), साजीद ऊर्फ शाहरुख अर्शद दिवाण (रा.रविवार पेठ, मोमीन मोहल्ला, ता.कराड, जि.सातारा) असे असल्याचे सांगितले.

 हे वाचा..स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी अहमदनगर मध्येच पाहिले : इंजि. वाघ

त्यांचे ताब्यातील वाहनांची  झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेली हिरा गुटखा व पानमसाला मिळुन आला. त्याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी हा माल महंमद सोहेल निपाणीकर व नदीम गुलखान पठाण (दोन्ही रा. बेळगांव, कर्नाटक) यांनी कोल्हापूर येथे भरुन देऊन मिरजगाव अहमदनगर मार्गे नाशिक येथे विक्री करीता घेवुन जाणे करीता दिला आहे. अशी माहिती दिल्याने,

हे वाचा...दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय : ना.विखे पाटील 

पोलिसांनी वाहनातील विविध प्रकारचा हिरा गुटखा व पानमसाला, दोन अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व 1 फियाट कार अशा 28 हजार 70 हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सहा जणाविरुद्ध भा.द.वि.क. 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

हे वाचा...11 लाखांचे 40 मोबाईल मूळ मालकांना परत! 

Post a Comment

Previous Post Next Post