शाळांच्या परिसरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव; मुख्याध्यापक, प्राचार्यांसोबत घेतली बैठक
। अहमदनगर । दि.23 ऑक्टोबर 2023 । शाळा,महाविद्यालयांच्या परिसरात अवैधधंदे चालविणार्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुख्याध्यपक व प्राचार्यां सोबत झालेल्या बैठकीत सांगितले. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांची बैठक दि. 18 रोजी घेण्यात आली.
शाळेच्याा परिसरात अवैध धंदे सुरु असल्यास त्याची माहिती कोतवाली पोलिसांना देण्याचे आवाहन यावेळी यादव यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांना केले आहे. शाळा, शाळेतील मुलांना येणार्या अडीअडचणी, शाळा भरण्याचे व सुटण्याचे वेळेत त्रास देणारे टवाळखोर यांची माहिती पोलिसांना दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करु, असे आश्र्वासन यादव यांनी दिले.
तसेच शाळेच्या परिसरात कुठेही अवैध तंबाखू, गुटखा विक्री होत असल्यास त्याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत दामिनी पथक पेट्रोलिंगसाठी नेमल्याचेही यादव यांनी सांगितले.
या बैठकीला भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे के.एस.साबळे, चाँद सुलताना विद्यालयाचे एस. एम.समी इमाम, सरस्वती मंदिर नाईट स्कुलच्या श्रीमती विणा कु- हाडे, उध्दव कडमीचे सुनिल मोहिते, समर्थ विद्यामंदीर विद्यालयाचे बी.एस.वाव्हळ, रुपीबाई बोरा महाविद्यालयाचे सोमनाथ नजन, प्रेमराज गुगळे महाविद्यालयाचे दत्तात्रय कसबे, सविता रमेश फिरोदिया प्रशाळेच्या श्रीमती योगिता गांधी, प्रगती महाविद्यालयाचे सी.व्ही देशपांडे, दादा चौधरी विद्यालयाचे एस.बी.येवले आदींची उपस्थिती होती.
शाळांच्या परिसरात कोतवाली पोलिसांचे छापे शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात टपरी लावून व इतर मार्गाने गुटखा, तंबाखू, मावा विक्री करणार्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील आयटीआय कॉलेज लगत असणार्या भिंतीजवळ एका टपरीमध्ये तसेच मल्हार चौकातील आयकॉन शाळेसमोर एका टपरीमध्ये मावा विक्री करणारर्या दोघांवर कारवाई करण्यात आली.
शहाजी नामदेव घोंगडे (वय 45, रा. भवानीनगर, अहमदनगर) व उत्तम रामभाऊ मिसाळ (वय 55, रा.मल्हार चौक, अहमदनगर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही ठिकाणाहून साडेचार हजार रुपये किमतीचा तयार केलेला मावा जप्त करण्यात आला आहे.
