चोरी गेलेली बोअरचे गाड़ी तामिळनाडू येथून नेवासा पोलीसांनी केली जप्त


 । अहमदनगर । दि.27 ऑगस्ट 2023 । नेवासा पो.स्टे. गुरनं ८३७/२०२३ भादविक. ३८१ वा गुन्हयात विष्णु श्रीरंग निपुंगे रा. नेवासा फाटा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली की, त्यांचे मालकीची बोअरची गाडी नेवासा येथून 35,00,000/- (पस्तीस लाख रुपये किमतीची KA 01 MF 1516 बोरीगची गाडी ड्रायव्हर नामे मिस्टर मुरुगेशन गोविंदन रा.D NO 07 IRANIYAPADAYACHI STREET KEERIPATTY PO ATTUR TK SALAM DT राज्य तामीळनाडू याने सन 2019 मध्ये (निश्चीत तारीख आठवत नाही) त्यांना न सांगता चोरुन घेवुन गेलेला आहे अशी फिर्याद दिलेने वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयातील चोरीस गेलेला माल व आरोपीताचे शोधा करीता मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला साहेब व अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे साहेब व  स्वाती भोर मॅडम तसेच मा सुनिल पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगांव यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणं पो. नि.  शिवाजीराव डोईफोडे यांनी नेवासा पो.स्टे चे पो.स. ई. एस. जी. ससाणे पो.स. ई. मनोज मोंढे, पोकों शाम गुंजाळ, पोकों सुमित करंजकर, पोकों राम वैद्य असे पथक नेमले होते त्यांनी वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तामीळनाडु येथे जावून चोरीस गेलेली 35,00,000/- (पस्तीस लाख रुपये) किमतीची KA 01 MF 1516 बोरींगची गाडीचा बारकाईने शोध घेवून सदरची गाडी रिकव्हर करून जप्त करुन तीला पुन्हा नेवासा येथे आणले आहे. तरी पुढील तपास पो. स. ई. एस. जी. ससाणे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post