के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

 


। अहमदनगर ।  दि. 29 ऑगस्ट 2023 ।  के.के. रेंज व अहमदनगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित अधिकार्‍यांकडून आढावा घेतला.

के के रेंजसाठीचा  प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून सर्वोतोपरी  प्रयत्न करण्यात येतील.  यासंदर्भात संरक्षण खात्याच्या अधिकार्‍यांशी आपण वैयक्तिक चर्चा करत आहोत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लवकरच लोणी येथे येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून केके रेंजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

आरक्षित जमीनीबाबत शेतकर्‍यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व विहित वेळेत पुर्ण करण्यात यावे. हे काम करत असताना कामाचा दर्जा व गुणवत्ता उच्च दर्जाची राहील याची काळजी घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post