राज्य एम एड शिक्षक कृती समिती या संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न
संघटनेच्या राज्याध्यक्षपदी राजू जाधव, राज्य उपाध्यक्षपदी राजेंद्र निमसे तर राज्यकार्यवाहक पदी जनार्धन बोटकर यांची निवड
। पुणे । दि.25 ऑगस्ट 2023 । महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम.एड.प्राथमिक शिक्षक कृती समिती या संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज्य पदाधिकारी यांचे पूनर्गठन करण्यात आले असून पूढील तीन वर्षांसाठी राज्याध्यक्षपदी राजू जाधव, राज्य उपाध्यक्षपदी राजेंद्र निमसे आणि राज्यकार्यवाहकपदी जनार्धन बोटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राज्य एम.एड कृती समितीचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच माध्यमिक शिक्षक भवन, जिल्हा अहमदनगर येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व विदर्भ या प्रशासकीय विभागातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोकण विभागाच्या प्रतिनिधींनी या मेळाव्यासाठी ऑनलाइन संपर्क साधला आणि आम्ही उच्च शिक्षित शिक्षक राज्य कृती समिती या संघटने बरोबर असल्याचे सांगितले.
यावेळी राज्य एम.एड कृती समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकार्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून यामध्ये राज्यकोषाध्यक्ष पदी तेजराव देशमुख (अमरावती), राज्यकार्या चिटणीस देवीप्रसाद तावरे (पुणे), राज्यउपाध्यक्ष धन्यकुमार तारळकर(सातारा), वसंत वाडीले (औरंगाबाद), मराठवाडा विभाग विभागीय महिला अध्यक्ष नसरीन सय्यद, राज्य कार्यवाहकपदी जनार्धन बोटकर, राज्य कार्या. सहचिटणीस राजेश ढोबळे, कोकण विभागप्रमुख नवनाथ जाधव, नागपूर विभाग प्रमुख राजेश वडप्पालिवार, अमरावती विभागप्रमुख शिवाजी डोंगरदिवे, नाशिक विभाग संपर्कप्रमुख रावसाहेब पगार यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित राज्य पदाधिकारी यांच्या ही नियुक्त्या सर्वसंमतीने लवकरच करण्यात येणार असल्याचे राज्यकोषाध्यक्ष तेजराव देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र निमसे यांनी सांगितले.
यावेळी राज्याध्यक्ष राजू जाधव म्हणाले की, ही संघटना दोन वर्षांपूर्वी धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या रजिस्ट्रेशन नुसार स्थापन झाली होती. मात्र अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रश्नासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करणेकामी कामगार श्रमिक संघ अधिनियम 1926 नुसार शासकीय, श्रमिक संघ नोंदणी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांची मान्यता घेणे गरजेचे होते. त्यानुसार 1 जून 2023 रोजी हे रजिस्ट्रेशन या संघटनेस प्राप्त झाले आहे.
या रजिस्ट्रेशनचे अधिकृत उद्घाटन यावेळी करण्यात आले. लवकरच विभागवार व जिल्हावार संघटनेमध्ये काम करण्यास इच्छुक असणारे पदाधिकारी नेमण्यात येणार असून सर्व उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना न्याय देऊन पदोन्नतीमध्ये एम एड, बीएड व इतर शिक्षणशास्त्रामध्ये उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणार्या शिक्षकांनाही वरिष्ठ पदांवर पदस्थापना करणे संदर्भात सर्वसमावेशक प्रयत्न केला जाणार असून राज्यातील इतर सर्व प्राथमिक शिक्षकांच्या प्रस्थापित संघटनांचेही वेळोवेळी सहकार्य घेतले जाणार आहे.
ह्या पदस्थापना होत असताना कार्यरत व अनुभवी शिक्षकांना नेमणूका दिल्यास शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याने शासनाच्या अर्थ व ग्रामविकास विभागाला यापूर्वी ही चर्चेतून सांगितले आहे. या संघटनेने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेबरोबरच अनेक निवेदने ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्री, ग्रामविकास मंत्री त्याचबरोबर मंत्रालय सचिव, ग्रामविकास व शिक्षण विभाग, शिक्षक आमदार, विधानसभा व विधानपरिषद आमदार यांना दिलेली आहेत.
त्यानुसार काही प्रमाणात यशही आले आहे. काही प्रमाणात पदोन्नतीच्या सेवाशर्थी बाबत नियोजन चालू आहे, लवकरच नव्या नियोजनाने पुन्हा मंत्रालय, मुंबई येथे भेटून याबाबत चर्चा करण्यात असल्याचे आणि निश्चित धोरण तयार करण्याबाबत कार्यवाही होणेबाबत प्रयत्न करणार असल्याचे राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले.
राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांना जास्तीत जास्त संघटित करून व या सर्वांना बरोबर घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न करणार असल्याचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब पगार ,नवनाथ जाधव ,विश्वनाथ काशीद यांनी यावेळी सांगितले .
महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम एड कृती समिती या संघटनेला आयुक्तांचे शासकीय रजिस्ट्रेशन राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी प्राप्त केल्याबद्दल राज्य कोषाध्यक्ष तेजराव देशमुख यांचेसह देवीप्रसाद तावरे, राजेश ढोबळे, जनार्दन बोटकर, वसंत वाडीले, नसरीन सय्यद, संगीता कातकडे, मंजुषा भोसले, सुवर्णलता ठाकूर, सुनंदा कुलकर्णी, संगीता घोडके, चित्रा पवार, दिनेश मेहर, शिक्षक बॅकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे, प्रल्हाद भालेकर, धन्यकुमार तारळकर, शशिकांत वाघुलकर, संदीप भालेराव, सुनील शिंदे, उद्धव डमाळे, मधुकर बेरड ,गणेश कुलांगे, बाळासाहेब देंडगे, ज्ञानेश्वर कोळेकर, सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजी माने, अमोल गांगर्डे, सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वनाथ काशीद यांनी चर्चेत भाग घेऊन मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश ढोबळे, सुत्रसंचालन प्रल्हाद भालेकर, तर आभार बाळासाहेब देंडगे यांनी मानले.या राज्यस्तरीय मेळाव्याचे यशस्वी संयोजन व नियोजन अहमदनगर जिल्हा उच्च शिक्षित एम एड प्राथमिक शिक्षक कृती समितीने केले.
------
💥 तलाठी परीक्षेपासून कुणीही वंचित राहणार नाही : ना.विखे पाटील
💥 29 सप्टेंबर रोजी डाक पेन्शन अदालतीचे आयोजन
💥 सीमा देव यांचे निधन चटका लावणारे : मुख्यमंत्री
