29 सप्टेंबर रोजी डाक पेन्शन अदालतीचे आयोजन

। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट 2023 । टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी 53 व्या डाक पेन्शन अदालतीचे २९ सप्टेंबर, २०२३  रोजी ११-०० वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी विहित प्रपत्रातील अर्ज तीन प्रतिमध्ये लेखाधिकारी, मुख्य पोस्टमास्तर, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २५ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत झाले आहेत, ज्यांची सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे तीन महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक अदालतीमध्ये  विचार केला जाईल. 

पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे,वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी, एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणाचा विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post