रविवारी एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रविवार 27 ऑगस्ट रोजी एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

 
। अहमदनगर । दि.25 ऑगस्ट 2023 ।अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा रविवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता  सप्तक सदन, खिस्त गल्ली, नगर येथे आयोजित केली असल्याचे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.

या स्पर्धेत प्रोत्साहन म्हणून अंदाजे 30 हजार रुपयांचे बक्षीसे देण्यात येणार असून 9 वर्षाखालील गट, 14 वर्षाखालील गट, 19 वर्षाखालील गट, मुलींचा गट व खुला गट इत्यादी गटात पाच रोख बक्षिसे व पाच थ्रीडी करंडक देण्यात येणार आहेत. असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

आत्तापर्यंत 125 खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून रविवार 27 तारखेला सकाळी नऊ वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार असल्याचे बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. वय वर्ष 9, 14, 19 व मुली अशा विविध गटांमध्ये प्रोत्साहन म्हणून 10 बक्षीसे दिली जाणार आहे त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेत नाव नोंदणी करावी असे आवाहन

सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, शाम कांबळे इत्यादींनी केले आहे. स्पर्धेचे प्रमुख पंच सागर गांधी असून त्यांना देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर इत्यादी पंच त्यांना सहकार्य करणार आहेत. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क. यशवंत बापट 9326092501, पारुनाथ ढोकळे9850704268, असे आव्हान अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post