बोगस बियाणांसंदर्भात कायदा कडक करणार : फडणविस


। मुंबई । दि.17 जुलै 2023 । महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून ते 4 ऑगस्टपर्यंत असणार आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोगस बियाण प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांसह अनेक मंत्री शरद पवारांच्या भेटीला

राज्यात पाऊस कमी असल्याने काही भागात अद्यापी पेरण्या झालेल्या नाहीत. शेकर्‍यांवर दुबार पेरणीचे वेळ आल्यास सरकार शेतकर्‍यांच्या पाठशी उभे राहणार असल्याचे फडणविस यांनी सांगितले आहे. तसेच बोगस बियाणांसंदर्भात कायदा कडक कायदा करणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे, 

'आयटी' तील युवतीची ऑनलाईन फसवणुक

खतं आणि बोगस बियाणांवर कारवाई तर होणारच आहे. तसेच काल यासंदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने नव्याने ज्याप्रमाणे बीटीचा कायदा केला. ज्याठिकाणी बियाणं फेल झाल्यानंतर त्या कंपन्यांवर थेट कारवाई करता येते.

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न 

 

Post a Comment

Previous Post Next Post