12 वी च्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी


। पुणे । दि.02 मे 2026 । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेची प्रतीक्षा अखेर संपली. या परीक्षेचा निकाल आज शनिवार, 2 मे 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला.

सविस्तर विजयमार्गचा अंका वाचा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळमार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच तो पाहण्यासाठी अनेकांनी मोबाईलचा वापर करत निकाल पाहिला.

सविस्तर विजयमार्गचा अंका वाचा...

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला आहे, तर कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल आहेत. यावर्षी देखील निकाल घटला आहे. गेल्यावर्षी 91.88 निकाल होता यावर्षी 2.0 टक्क्याने निकाल कमी झाला आहे.

 

शाखेनुसार निकालाची टक्केवारी

विज्ञान शाखा- 96.44 टक्के
वाणिज्य शाखा  87.03 टक्के
कला शाखा   78.02 टक्के

Post a Comment

Previous Post Next Post