राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न


। अहमदनगर । दि.10 जुलै 2023 । महिला व बाल विकास विभाग, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्था व महाराष्ट्र थांग- ता- असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संगमनेर कॉलेज येथे  उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अरुण गायकवाड हे तर  प्रमुख अतिथी म्हणुन गट विकास अधिकारी अनिल नागणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती सातळकर, संरक्षण अधिकारी, संगमनेर बी. एन. गोर्ड उपस्थित होते.

 कार्यक्रमात उपस्थित युवतीचे मनोबल उंचावण्यासाठी स्मिता गुणे यांनी मार्गदर्शन केले.  सायबर क्षेत्रात मोबाईल वापरताना युवतीनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत अँड. श्रीराम गणपुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील युवतींनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी निधी ट्रस्टचे जिल्हा समन्वय ओंकार मगदुम, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या श्रीमती स्मिता गुणे व महाराष्ट्र थांग-ता- असोसिएशनचे लक्ष्मण उदमले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post