अजित पवार गटाचे सर्व आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला


। मुंबई । दि.17 जुलै 2023 । आजपासून राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असला तरी आज अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार आणि आमदार
हे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. अजित पवारांसह अनेक आमदार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट भेट घेण्यासाठी दाखल झाले.

शिवसेनेनंंतर राष्ट्रवादीतही बंड झाल्याने हे अधिवेशन चांगलच वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता दोन दिवसांपासून विविध घटनांना वेग आला आहे. काल अजित पवार आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी भेट घेतली होती. आज देखील शरद पवार यांची भेट घेणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post