'आयटी' तील युवतीची ऑनलाईन फसवणुक


। अहमदनगर । दि.17 जुलै 2023 । गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. यातच आता यू-ट्यूब चॅनलला लाईन आणि सबक्राईब करण्याचा अमिषाने युवीची साडेतीन लाखांची फसवणूक झाली असल्याची समोर आले आहे. संबंधित युवती इन्फोसिस या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरीला असून, तिलाच ऑनलाईन फसविण्यात आले आहे.

शरद पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले : प्रफुल्ल पटेल

दरम्यान येथील बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या संबंधित युवतीने शनिवारी (दि.15) दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवतीला 12 जून रोजी एका अनोळखी नंबरवरुन व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. युट्यूबवर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर वाढविण्यासाठी आम्ही पाठविलेल्या लिंकला ओपन करण्यात सांगण्यात आले.

अजित पवारांसह अनेक मंत्री शरद पवारांच्या भेटीला

त्यास लाईक आणि सबस्क्राईबर वाढवण्याचे टास्क या तरुणीला देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर तुमच्या अकाऊंटला पेमेंट जमा होईल, असा तो मेसेल जोता.दरम्यान, फिर्यादी युवतीने आलेली लिंक ओपन करुन लाईक आणि सबक्रायबरचे पाच टास्क पूर्ण केले. सहावा टास्क पूर्ण करण्यासाठी आधी त्यांना पैसे पाठवायचे होते. युवतीने टप्प्याटप्प्याने तीन लाख 50 हजार रुपये पाठविले.

देहर्‍यात घरफोडी : चार तोळ्याच्या दागिन्यांची चोरी

त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता समोरील व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. युवतीकडून गेल्या महिनाभरात हे पैसे पाठविले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. 

एक वर्षापासून पसार गुन्हेगार अटकेत

Post a Comment

Previous Post Next Post