। नवी दिल्ली । दि.12 मे 2026। राज्यातील 10 वी आणि 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून 10 वी नंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तर, 12 वीच्या परीक्षेनंतर कित्येक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते.
परंतु, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
नुकताच मोठा निर्णय घेत घेत नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपरफुटीचे आरोप केले जात होते. शेवटी सीबीआयने चौकशीचे आदेश देत थेट नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.
नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
