। कोल्हापूर । दि.6 जुलै 2023 राज्यातील सर्वांत उंच असलेले कळसूबाई शिखर नेज (ता.हातकणंगले) येथील 3 वर्षे 11 महिन्यांच्या अन्वी चेतन घाटगे हिने पुन्हा एकदा सर केले. गतवर्षी या दिवशी तिने 2 वर्षे 11 महिन्यांची असताना प्रथम हे शिखर सर केले होते.
बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी टोळी उघडकीस
तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया बूक आशिया बूक ऑफ रेकॉर्ड, वल्ड रेकॉर्ड आदींमध्ये झाली. अन्वीने शनिवारी (दि.1) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आई अनिता, वडील चेतन आणि प्रा.अनिल मगर यांच्यावर कळसूबाई सर करण्यात सुरुवात केली.
शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता : महसूल विखे पाटील
मुसळधार पाऊस, दाट धूके, अति वेगाने वाहणारे वारे यांचा सामना करीत ती साडेचार वाजण्याच्या सुमारास शिखरावर पोहोचली. त्यानंतर तिने दुसर्या दिवशी म्हणजे रविवारी (दि.2) दुपारी दोन वाजता अहमदनमरमधील पश्चिम घाटातील रतनगड (समुद्र सपाटीपासून 4300 फूट) हा चढाईस अत्यंत अवघड किल्ला सर केला.
अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन
मुसळधार पावसात व वेगाने वाहणार्या वार्याचा सामना करीत ती साडेचार वाजण्याच्या सुमारास शिखरावर पोहोचली. तीन वर्षे 11 महिन्यांच्या वयात रतनगड सर करणारी अन्वी ही सर्वांत लहान गिर्यारोहक ठरली आहे. दोन्ही शिखर दोन दिवसांत सर करणारी ती एकमेवर गिर्यारोहक ठरली आहे. तिला कारगिल योध्दा नाईक दीपचंद व मुक्ता फाउंडेशनचे सहकार्य लाभले.
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
