। अहमदनगर । दि.15 जुलै 2023 । रात्रीच्या वेळेस घराच्या किचनच्या दरवाजाचा कर्डी आणि कायंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावात बुधवारी (दि.12) रोजी रात्री 11 ते गुरुवार (दि.13) पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली.
जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्याच्या नावावर बनावट फेसबूक अकाउंट
याबाबत किशोर रोहिदास काळे (वय 42, रा.देहरे, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी काळे यांचे देहरे गावात घर असून, बुधवारी (दि.12) ते घरात झोपे असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या किचनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कशाचतरी सहाय्यने तोडून आत प्रवेश केला.
भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप : मुख्यमंत्री
घरातील कपाटाची उचका-पाचक करत दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, दीड तोळ्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याचे कानातील टॉप्स व झुमके असा चार तोळ्याचा ऐवज चोरुन नेला. पहाटे झोपेतून उठल्यावर काळे यांच्या ते निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधला.
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
ही माहिती मिळताच एमआयडीसीचे स.पो.नि.राजेंद्र सानप, पो.हे.कॉ.पवार व पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर दुपारी काळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला.
