एक वर्षापासून पसार गुन्हेगार अटकेत


। अहमदनगर । दि.15 जुलै 2023 ।  एक वर्षापासून पसार असणार्‍या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. फिर्यादी विजय बाबुराव जाधव यांनी फिर्याद दिली होती की, मनोज साळुंके, रवी साळुंके, संदेश गायकवाड व त्याचा अनोळखी साथीदार यांनी हातात कोयते व लाकडी दांडके घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.

देहर्‍यात घरफोडी : चार तोळ्याच्या दागिन्यांची चोरी

कोयत्याचा धाक दाखवून परिसरात मोठयाने आरडाओरड करुन दहशत केली. तसेच आम्ही येथील दादा आहोत. आमच्या शब्दाच्या पुढे गेले तर एकालाही जिवंत सोडणार नाही,अशी धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील एक वर्षापासून पसार असणारा आरोपी संदेश गायकवाड हा वाळकी येथे आला आहे. सपोनि सानप यांच्या सूचनेवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीस वाळकी (ता.नगर) येथून शिताफीने अटक करुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदेश दाविद गायकवाड (वय 25, रा.वाळकी ता.नगर) असे सांगितले.

चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत ; दोघे अटकेत 

Post a Comment

Previous Post Next Post