। मुंबई । दि.16 जुलै 2023 । गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेवून आशीर्वाद घेतले असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
अजित पवारांसह अनेक मंत्री शरद पवारांच्या भेटीला
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. वेळ न मागता आम्ही आलो. शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचं कळालं होतं.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
त्यामुळे संधी साधून आम्ही इथे आलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे : उपमुख्यमंत्री
Tags:
Politics
