माझी वसुंधरा ३.० अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महापालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक

। अहमदनगर। दि.06 जून । माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी,जल,वायू,अग्नी,व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धे अंतर्गत  ३ ते १० लक्ष लोकसंख्येच्या गटा मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगर पालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला असून ६ कोटीचे पारितोषिक जाहीर झाले.

संघर्षातून मिळालेले यश प्रेरणादायी : सुधीर भापकर 

मुंबई येथे दिनांक ५ जून २०२३ रोजी माझी वसुंधरा ३.० सन्मान  सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.महापौर रोहिनीताई संजय शेंडगे,आयुक्त डॉ. पंकज जावळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.पुष्पाताई अनिल बोरुडे,उपायुक्त यशवंत डांगे,प्रभाग अधिकारी मेहेर लहारे, प्रसिद्धी व उद्यान अधिकारी शशिकांत नजान यांनी पुरस्कार स्वीकारला.

शेती मातीचा होणार सन्मान; कांदा पिकाला मिळणार अनुदान 

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन,संरक्षण,व जतन करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकाने केलेल्या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय  बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने महापालिका आयुक्त, महापौर पदाधिकारी व अहमदनगर महानगरपालिकेचे अभिनंदन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन 

माझी वसुंधरा अभियान ३.० सन्मान सोहळा सोमवार दि. ५ जून २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,  अध्यक्ष महाराष्ट्र विधान सभा राहुल नार्वेकर राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महसूल, शंभूराजे देसाई, प्रधान सचिव पर्यावरण प्रवीण दराडे
मा.आ.श्री.संजय गायकवाड इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जमशेद भाभा थिएटर, एन. सी.पी.ए. नरिमन पॉईंट, मुंबई यथे संपन्न झाला.

अंबिका महिला बँकेचे अध्यक्षा सौ आशा मिस्कीन यांना सेवाश्री पुरस्कार 

Post a Comment

Previous Post Next Post