। अहमदनगर। दि.06 जून । दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्ञानदीप ग्रामसुधार प्रतिष्ठानचे ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय सोनेवडी ता.नगर या विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या विद्यालयाचा निकाल 95.23 टक्के लागला आहे. विद्यालयातील एकूण 21विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रगती प्रशांत दळवी 89.20 टक्के , द्वितीय प्रांजल बाजीराव साळवे 89 टक्के , तृतीय क्रमांक तनुजा विजय लोणकर 88.60 टक्के मिळवत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाला ज्ञानदीप ग्रामसुधार प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मच्छिन्द्रनाथ येणारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर संस्थेचे सचिव अनिल दळवी यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक करत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक दीपक काकडे यांनी याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करत नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दीपक काकडे, शिक्षक सतीश सुंबे, देविदास दळवी, बिभीषण गावडे, रंजना दळवी, प्रशांत दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.
